साईकिरण टाइम्स | ९ नोव्हेंबर 2020
श्रीरामपूर | तालुक्यातील अनेक मुख्य रस्त्यांवर ऊस वाहतूक ही बैलगाड्यांमधून होत आहे. मात्र अनेक बैलगाडीचालक अनाधिकृतरित्या बैलगाडी जुगाडाचा वापर करीत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील इतर वाहतुकीस मोठा अडथळा होत असून अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात वाढलेले आहेत. तरी या अनाधिकृत वाहतुक करणाऱ्या बैलगाड्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी केली आहे.
प्रसिद्धिीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्वसाखर करखान्या मार्फत ऊस वाहतुकीसाठी कारखाने परवाना नसलेले बैलगाडी जुगाड वापरतात तसे लिखित करार करूनकरून हा अवैध वाहतूक उद्योग चालतो. या बैलगाडी जुगाड मुळे रस्त्याने जाणाऱ्या इतर साधनांना अडथळानिर्माण होतो आहे अनेकअपघात यामुळे होताहेत ,त्यात हे ट्रॅकटर चालक दोन तीन बैलगाडी जुगाडएकामागे एक जोडताहेत त्याना मान्यता प्राप्त जोडणी नाही आणि तेचालताना वाकडे तिकडे वळणे घेत डुलत -डुलत चालते यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता सोडूनलांब उभे राहून घावे लागते अन्यथा हेअंगावर। येऊन अपघात होऊ शकतो.
यासर्व अवैध ऊस वाहतुकीस आपली मूक संमती आहे असे दिसते कारण दि 10/2 /2020रोजी निवेदन देऊन आपण कोणतीही कारवाई केली नाही पुन्हा आम्ही आपल्याला विनंती करतो की ही अवैध ऊस वाहतूक थांबून साखर कारखान्यावर कायदेशी रकारवाई करावी अन्यथा आपल्या कार्यालयास कोणतीही पूर्व सूचना न देता घेरवो आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, शहराध्यक्ष शरद बोंबले, शहर कार्याध्यक्ष गोरख शेजुळ, शहर उपाध्यक्ष मनोज होंड, जिल्हा सरचिटणीस प्रवीण देवकर आदींच्या सह्या आहेत.