साईकिरण टाइम्स | ७ नोव्हेंबर २०२०
आमचे व्यवसाय ठप्प झाले असून, उत्पन्नाचे स्रोतही बंद झाले. कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने लग्नसमारंभ, इतर पारंपरिक कार्यक्रमात तसेच सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी साऊंड सिस्टीम वाजविण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी श्रीरामपूर तालुका साऊंड लाईट सोशल असोसिएशनच्या वतीने पोलीस, महसूल प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन केले गेले असल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम लग्नसमारंभावर बंदी घातली. त्यामुळे आमचे व्यवसाय ठप्प झाल्याने उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. कर्ज घेऊन साऊंड सिस्टीमची खरेदी केली. कर्जाचे हप्ते थकीत आहेत. बँक, वित्तीय संस्थांचा कर्जहप्त्यासाठी तगादा चालू आहे. जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे लग्न समारंभ तसेच सार्वजनिक ठिकाणी साउंड सिस्टीम वाजविणेची प्रशासनाने परवानगी द्यावी, आम्ही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करू, असे साऊंड सिस्टीम धारकांनी म्हंटले आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर 'श्रीरामपूर तालुका साऊंड लाईट सोशल असोसिएशनचे' अध्यक्ष संजय थोरात, उपाध्यक्ष दत्ता काळे, सचिव राकेश भावसार, खजिनदार सागर झोटिंग, इमदादा पठाण, प्रभाकर सिनारे, किशोर बर्डे, सुरज बोरावके, सिद्दीक शाह, शिवा थोरात, वसीम शेख, सोनु ग्रोवर, महेश छतवाणी, संतोष पवार, अमोल कंचरलाल, सचिन अहिरे, सचिन जगरलाल, प्रमोद बोरसे, शैलेश धुमाळ, युवराज भागवत, दत्तू पाचपिंड, विशाल रणवरे, सतीश वाकडे, दत्तू उंदरे, संयोग भुजबळ, राहुल मकासरे, शाहिद शेख, सचिन भावसार अनिकेत भुसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.