साईकिरण टाइम्स | ९ नोव्हेंबर २०२०
श्रीरामपूर | इ-निविदा घोटाळ्याबाबत छावा संघटनेच्यावतीने वेळोवेळी आवाज उठविण्यात आला. मात्र मुख्य दोषींची पाठराखण करीत मोजक्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्यात प्रत्यक्ष दोषी असलेले ग्रामसेवक असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. शिवाय प्रक्रियेत हस्तक्षेप करणारे खासगी संगणक चालक यांच्यावर फौजदारी करण्यात यावी अनेकदा मागणी करूनही कारवाई होत नसल्याने मंगळवारी दि. 10 नोव्हेंबर रोजी अखिलभारतीय छावासंघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यलया समोर घंटा नाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ई-निविदा प्रकियेबाबत छावाच्यावतीने वेळोवेळी आवाज उठविण्यात आला. गटविकास अधिकाऱ्यांपासून आयुक्तांपर्यंत निवेदन देऊन या घोटाळ्याची माहिती शासनस्तारावर देण्यात आली. याबाबत दि 21 जानेवारी2020 पासून छावाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली. दोन वेळा उपोषण झाले अनेक लेखी आश्वासनदिले गेले. मात्र या घोटाळ्यात प्रत्यक्ष दोषी असलेल्या सर्व ग्रामसेवकांवर कारवाई होण्याऐवजी मोजक्या लोकांवरतुटपुंजी कारवाई करण्यात आली.
यासर्व घोटाळ्यात प्रत्यक्ष टेंडर ज्या खाजगी संगणक चालकांवर कडे झाले ,त्यांना कोणत्याही प्रकारचे शासकीय परवाना नाही. त्यांचे आयपी ॲड्रेस तपासल्यास अनेक गोष्टी उघड होतील. ज्या ग्रामसेवक आणि गटविकासअधिकारी यांनी दलित वस्ती योजनेसाठी असणारी डी एस सी कधी कोणी वापरली याची संपूर्ण चौकशी करून गटविकास अधिकारीयांची दैनंदिनी तपासावी व त्यांच्यावर शिस्तभांगची प्रशासकीय गोपनीय माहिती बाहेर पुरवल्याची कारवाई करावी आणि ज्या खाजगी संगणक चालकांनी परवाना नसताना हा गोरख व्यवसाय मांडलाय त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. यामागणीसाठी छावाच्यावतीने गेल्या आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याबाबत कुठलीही कारवाई न झाल्याने आता आज . मंगळवार दि. 10 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने आपल्या कार्यलयासमोर घंटा नाद आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख सचिन खंडागळे यांनी सांगितले.