अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१८ टक्के


साईकिरण टाइम्स | ९ नोव्हेंबर २०२०

अहमदनगर जिल्ह्यात आज २९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार ९८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६९  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३३४  इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३७ आणि अँटीजेन चाचणीत ९१ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, जामखेड ०१,  नगर ग्रामीण ०८, नेवासा ०७, पारनेर ०१, पाथर्डी ०७,, संगमनेर ०२, श्रीगोंदा ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१  अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९, अकोले ०२  नगर ग्रामीण ०२,नेवासा ०८, पारनेर ०१,; पाथर्डी ०१,  राहाता ०२,  राहुरी ०३,, संगमनेर ०५, शेवगाव ०२, श्रीरामपूर  ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ९१  जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा ०४, अकोले ०१, जामखेड ०८, कर्जत ०३ , कोपरगाव १०, नगर ग्रामीण ०३,  नेवासा १२, पारनेर ०२, पाथर्डी १४, राहता ०७, राहुरी ०५, संगमनेर १२, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ८१, अकोले ११ जामखेड ०४, कर्जत १४ कोपरगाव ०९,  नगर ग्रा.२३, नेवासा ०९, पारनेर १३,,पाथर्डी १६, राहाता १६, राहुरी १५, संगमनेर ५०,, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०३ इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post