बाबासाहेब वाघचौरे | दि.२० नोव्हेंबर २०२०
श्रीरामपुर येथे 'श्रीदत्त होमिओपॅथिक क्लिनिक आणि हिलिंग सेंटरचे' उद्घाटन नेवासा येथील अटलबिहारी वाजपेयी होमिओपॅथिक काॅलेजचे प्राचार्य डाॅ. प्रशांत गंगवाल यांच्या शुभहस्ते व अहमदनगर येथील होमिओपॅथिक तज्ञ डाॅ. साईनाथ चिंतासर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न झाले.
याप्रसंगी डाॅ रियाज पटेल, डाॅ सुरज थोरात डाॅ. सौ.सुनिता चिंता, डाॅ.संकेत लांडे, डाॅ.अनसुप्रसाद, डाॅ. गणपत जाधव,डाॅ.अतुल शिंदे,नगरसेविका सौ.डोळस, रवि पाटिल, नाभिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघचौरे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास भागवत, माजी अध्यक्ष दिलीप विळस्कर, विलासराव निकम,दीपक गायकवाड, पत्रकार शिवाजी खजिनदार, चांगदेव कडु,अशोकराव बनकर, विजय निकम, अमोल तुपे,नारायण काळे, भरत गिरी, रवि शहाणे, प्रा.रवि कवी, बाळसाहेब वाघ , राजेंद्र विश्वास, बन्सी कांबळेसर,शरद पंडित, गायके सर,सोपान राऊत,उगले गुरुजी, आमित येवले,सुभाष महाले,संजय वाघचौरे, जयेश वाघचौरे, सौ.लता वाघचौरे, नाभिक समाजातील सर्वच पदाधिकारी सह विविध क्षेत्रातिल मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी क्लिनिक चे डाॅ. गणेश पोपट राव वाघचौरे यांनी सर्वाचे स्वागत केले. प्रस्ताविक सौ.प्रा.लताताई वाघचौरे यांनी केले. आभार रयत शिक्षण संस्थेचे मुख्यध्यापक पोपटराव वाघचौरे यांनी मानले.