साईकिरण टाइम्स |२१ नोव्हेंबर २०२०
श्रीरामपूर ( अहमदनगर ) सरकारने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ न केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर येथील महावितरण कार्यालयासमोर शनिवारी (दि.२१) घंटानाद आंदोलन केले.
आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, प्रवक्ते प्रवीण जमदाडे, श्रीधर कराळे, भरत डेंगळे, यशवंत जेठे, गौतम राऊत, श्रीकांत महाकाळे,दीपक भोकपोडे, महेश नेहुल, दीपक परदेशी, किशोर वाडीले, राज मोहम्मद शेख, राहुल राऊत, अभिजित राऊत आदी उपस्थित होते.
शेतकरी, छोटे व्यावसायिक, व्यापारी, संघटित-असंघटित मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार, सर्वसामन्यांचे दिल्ली सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही विजबिल माफ करायला हवे होते, असे आपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सरकारने अनेकदा वीजबिल माफी संदर्भात घोषणा केल्या;मात्र, दिलेला शब्द अजूनही सरकारकडून पाळण्यात आला नाही. संपूर्ण देशामध्ये कोरोना सारख्या भयानक विषाणूच्या प्रादुर्भाव निर्माण झाला. हजारो नागरिक या रोगाशी लढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाँकडाऊन काटेकोरपणे पालन करण्यात आले. देशातील संपूर्ण आर्थिक चक्र थांबलेले होते. दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे देवाण-घेवाण ठप्प झाली. त्यामुळे शेतकरी व्यापारी संघटित व असंघटित कामगार यांच्यावर वाढीव वीजबिलाचे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार नाही, शेती मालाला बाजारपेठेत उठावा नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण होत आहे. महाराष्ट्र सरकारने दिल्ली सरकारच्या धर्तीवर सरसगट १०० युनिट लाईट बिल माफ करण्यात यावे, यासाठी आज महावितरण कार्यालयासमोर सरकारला जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही आणि वीज बिल माफ केले नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.