साईकिरण टाइम्स | १७ नोव्हेंबर २०२०
श्रीरामपूर |मंदिर खुली झाल्यानंतर आज येथील श्रीराम मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आरती करून शहरातील सर्व व्यापार्यांना दिवाळ-पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष मारूती बिंगले, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सतिश सौदागर, जिल्हा औद्योगिक आघाडीचे संयोजक सुनील चंदन, सांस्कृतिक आघाडीचे जिल्हा संयोजक बंडूकुमार शिंदे, माजी शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे, पत्रकार मिलींदकुमार साळवे, कांतीलाल बोकाडिया, अजित बाबेल, अमित मुथा, कांतिलाल बोकाडिया, डॉ. ललित सावज, नवीन गदिया, विशाल अंभोरे, युवा मोर्चाचे गणेश बिंगले, रूपेश हारकल, रवी पंडीत, सुनिल आहेर, अरूण धर्माधिकारी आदी कायकर्ते उपस्थित होते.
दिवाळी हा सण आनंदाची पर्वणी घेऊन येतो. मात्र यावेळी जगावर कोरोनाचे संकडट असल्याने अनेकांची दिवाळी दुःखात गेली. व्यापार्यांची आर्थिक घडीही अद्याप सावरलेली नाही. मात्र अशा परिस्थितीतही व्यपार्यांचे मनोबल वाढविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट घेत सर्व व्यापार्यांना पाठबळ दिले. यावेळी शहारातील मेनरोड व शिवाजी रोडवरील सर्व व्यापार्यांना त्यांच्या दुकानांमध्ये जाऊन कायकर्त्यांनी शुभेच्छा दिला.