साईकिरण टाइम्स | १० नोव्हेंबर २०२०
श्रीरामपूर शहरातील शिवाजी रस्ता परिसरात सोमवारी (दि.९) पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून २ लाख २५ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहा आरोपीना ताब्यात घेऊन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि.९) रोजी श्रीरामपूर पोलिसांना श्रीरामपूर शहरातील शिवाजी रोड परिसरातील जुगार अड्डा चालू असल्याची माहिती मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक दिपाली काळे यांच्या सूचनेनुसार डीवायएसपी संदिप मिटके, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी श्रीरामपूर यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल २ लाख २५ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु. क्र. २१६२/२० महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.