दिव्यांगाना वैश्विक ओळखपत्र वाटप


श्रीरामपूर-मुकबधीर विद्यालय श्रीरामपूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अहमनगर व मुकबधिर विद्यालय श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  दिव्यांग वैश्विक ओळखपत्र वाटप करताना रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.भारत गिडवाणी यावेळी रोटरी एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन सुरेश पाटील बनकर,  हसमुख पदमाणी, गुजराथी समाज ट्रस्टचे अध्यक्ष नारायणभाई पटेल,  अनिल पांडे,  उल्हास धुमाळ,  राजेश कुंदे, विनोद पाटणी, अनिल नारा, संजय साळवे ,विश्वास काळे आदि.(छाया-अनिल पांडे)

साईकिरण टाइम्स | 4 नोव्हेंबर 2020

श्रीरामपूर |  केंद्रशासन व राज्याशासनाचा सामाजिक न्याय विभागाच्यावतीने दिव्यांग आधिनियम कायदा २०१६ अंतर्गत दिव्यांगाना सुलभ सोयीसुविधा उपल्बध होण्यासाठी वैश्विक ओळखपत्र देण्यात आले असल्याचे,  रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.भारत गिडवाणी यांनी सांगितले.

जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अहमनगर व मुकबधिर विद्यालय श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुकबधीर विद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी शहर व तालुका दिव्यांग वैश्विक ओळखपत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ.गिडवाणी बोलत होते. सचिव हसमुख पदमाणी यांच्या शुभहस्ते व रोटरी एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन सुरेश पाटील बनकर यांच्या अध्यक्षतेखाली ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी  गुजराथी समाज ट्रस्टचे अध्यक्ष नारायणभाई पटेल, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अनिल पांडे, माजी उपप्रातपाल उल्हास धुमाळ, माजी अध्यक्ष राजेश कुंदे, विनोद पाटणी, अनिल नारा, आसान दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष विश्वास काळे, खजिनदार सौ. साधना चुडिवाल, सचिव वर्षा गायकवाड आदि उपस्थित होते. 

यावेळी डॉ.भारत गिडवाणी म्हणाले की, मुकबधीर विद्यालय, आसान दिव्यांग संघटनेच्यावतीने राबवण्यात आलेला हा उपक्रम दिव्यागाच्या जिवनात अमुलाग्र बद्दल करणारा आहे. रोटरीच्या माध्यमातुन श्रीरामपूर तालुक्यातील उवरीत दिव्यांगाना हि ओळखपत्रे मिळण्यासाठी पुढाकार घेऊन लवकरच तालुकास्तरीय मेळावा आयोजीत करण्यात येईल. 

रोटरी एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन सुरेश पाटील बनकर म्हणाले, संस्थेच्यावतीने दिव्यांगासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. दिव्यांगाचे वधुुवर मेळावे, त्यांच प्रमाणे त्यांचे विवाह करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दिव्यांगाना शासकिय सेवेत सामावुन घेण्यासाठी संस्था अघाडीवर असते.दिवाळी नंतर दिव्यांगाचा वधुवर परिचय मेळावा घेतला जाईल असे त्यांनी जाहिर केले.

रोटरी क्लबेचे माजी अध्यक्ष म्हणाले की, १७ वर्षेपुर्वी रोटरी क्लबच्यामाध्यामातुन दिव्यांग व्यक्तीला तीन चाकी सायकल व व्हिलचेअर,व साऊंड सिस्टीम देण्यात आली होती त्या व्यक्तीने त्यांच्या व्यवस्यात उंतुग भरारी घेतली आहे. अशा प्रकारे रोटरी क्लब नेहमीच दिव्यांगाच्या प्रश्नासाठी पुढाकार घेते.

वैद्यकिय सामाजिक आधिकारी संजय साळवे म्हणाले की, दिव्यांग कायदा आधिनियम २०१६ व दिव्यांग कायदा आधिनियम १९९५ च्या कायदातील तरतुदीचे सविस्तर विश्लेषन करताना दिव्यांगाचे हक्क व आधिकार व पुर्नवसन याबाबात सविस्तर विवेचन केले. वैश्विक ओळखपत्र संर्दभातील सविस्तर माहिती यावेळी विषद करण्यात आली. दिवाळीनंतर ऑनलाईन वधुवर मेळ्व्याचे नियोजन सध्या सुरु आहे. भविष्यात जे दिव्यांग वैश्विक ओळखपत्रापासुन अनभिज्ञन आहे. त्याबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.

यावेळी स्वागत गुजराथी समाज ट्रस्टचे अध्यक्ष नारायणभाई पटेल, प्रास्तविक संजय साळवे यांनी तर आभार मुख्याध्यापक कल्याण होन यांनी केले. यावेळी दिव्यांग संघटनेचे सलीम खाटीक, मोमिन शेख, मुकबधिर विद्यालयचे कैलास बनकर, मधुकर पवार, मुकींद गाडेकर, संजय पांडे  आदि उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post