साईकिरण टाइम्स | 4 नोव्हेंबर 2020
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातील ममदापुर येथे धान्य वाटपात घोटाळा झाला असल्याचा आरोप करत, धान्य गोदामात आवक झालेल्या पंचनामा पुस्तकाची तसेच ग्रामदक्षता समितीची इत्तिवृत्त तपासणी करण्याची मागणी, छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे यांनी केली आहे.
यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याचे मोफत धान्य, आक्टोबर महिन्याचे नियमित व मोफत तांदुळ कार्डधारकांना दिलेले नाही. रेशनधारकांना तीन महिन्याचा तांदुळ व हरबळा दाळ दिली नाही. २१ ऑक्टोबर २०२० रोजी पुरवठा निरीक्षकांनी दुकानाची तपासणी केली असता दोन क्विंटल तांदुळ प्रत्यक्षात शिल्लक होता; परंतु, २९ ऑक्टोबर २०२० पर्यत चाळीस क्विंटल तांदूळ कार्डधारकाला कसा वाटप केला? असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करत या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली.
कार्डधारकांना धान्य वितरित करताना बिले दिले जात नाही, ते का दिले जात नाही? असा सवाल वाघ व शिंदे यांनी केला आहे. ऑक्टोबर महिन्याचे धान्य २८ ऑक्टोबरला आले असताना ३१ ऑक्टोबरपर्यंत धान्य वाटप न करता नोव्हेबर मध्ये का केले? याचा खुलासा करावा. गोरगरीबांच्या तोंडातला घास पळविणाऱ्यांना छावा क्रांतिवीर सेना सोडणार नाही, असा इशारा वाघ व शिंदे यांनी दिला आहे.