साईकिरण टाइम्स | 2 नोव्हेंबर 2020
श्रीरामपूर शहरातील पूर्णवाद नगर येथे (दि.1) आयोजित केलेल्या 'कोविड १९ प्रोफेशनल प्राइमर्स लीग' या क्रिकेट स्पर्धेत 'श्रीरामपूर नगर परिषद कर्मचारी ११' या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकविले. शहरातील डाॅक्टर ११, ऍडव्होकेट ११, केमिस्ट ११, गुड माॅर्निग ११, श्रीरामपूर नगर परिषद कर्मचारी ११ हे संघ सहभागी झाले होते.
मागील आठ महिन्यांत शहरातील कोरोना व्हायरस विरूध्द ज्या व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी सामाजिक कार्य केले त्यांना मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
नगरपरिषद कर्मचारी संघासाठी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सीरीज, अनुक्रमे श्री सचिन खरात, अमर दाभाडे यांनी पटकविले. श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
यावेळी नगरसेवक श्यामलीग शिदे, मुख्तार शहा, प्रकाश ढोकणे, रवि पाटील, रईसभाई जहांगीरदार, कलीमभाई कुरेशी,भाऊसाहेब डोळस, अल्तमेश पटेल, आरोग्य विभाग प्रमुख घायवट, प्रकाश जाधव, जीवन सुरूडे आदी उपस्थित होते. विजयी संघात कर्णधार बंटी चव्हाण, सचिन खरात, लाखन दाभाडे, जय बागडे, अमर दाभाडे, जयराज बागडे,राकेश झिंगारे, प्रसाद चव्हाण, सचिन जेधे,जमील पठाण, राहुल दाभाडे, प्रसाद चव्हाण, चेतन बागडे, मयुर चव्हाण, रूपेश करोसिया आदी खेळाडू सहभागी झाले होते. सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी श्री दीपक चव्हाण यांनी आभार मानले.