साईकिरण टाइम्स | ११ नोव्हेंबर २०२०
देशभक्त, हुतात्मे व स्वातंञ्यसेनानी यांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंञ्याचा साक्षीदार असलेल्या विजय स्तंभाचे पाविञ्य राखण्यासाठी, स्तंभाच्या आरक्षित जागेवर रस्त्यावर दुकाने लावणार्यावर तात्काळ बंदी घाला, अशी मागणी परिसरातील देशभक्त नागरीकासह जेष्ठ पञकार व सामाजीक कार्यकर्तै विष्णुपंत डावरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे केली आहे.
जिल्हाधिकार्याना पाठविालेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुमारे दोनशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या व सुमारे ९८ वर्षाची उज्वल परंपरा जपत शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणार्या ग्रामपंचायतीने विजयस्तंभाचे पाविञ्य अबाधित राखण्यासाठी तत्कालीन सरपंच ग्रामनेते स्व. मुरलीशेठ खटोड यांनी चौथरा बांधून संरक्षक कठडे बसविण्यात आले होते.परंतू, दोन महिन्यापूर्वी बेशिस्त मालवाहू ट्रेपो चालकाने कठड्यास धडक दिल्याने कठड्याची मोडतोड झाली. या बेशिस्तखोर चालकाविरूद्ध विजय स्तंभाचे विद्रुपीकरण व पाविञ्य भंगाची देशभक्त नागरीक तक्रार करण्याअगोदरच कठड्याची राञीतूनच दागडुगी झाल्याचे निवेदनात स्पष्ट म्हटले आहे.