अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८१ टक्के

साईकिरण टाइम्स | 2 नोव्हेंबर 2020

अहमदनगर जिल्ह्यात आज १०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार १५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५०३ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६६ आणि अँटीजेन चाचणीत ७७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, जामखेड ०२, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०१, पाथर्डी ०३, राहुरी ०१, संगमनेर ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०४, कॅंटोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०१, जामखेड ०१, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०५, पारनेर ०१,पाथर्डी ०३, राहाता ०९, राहुरी ०२, संगमनेर ११, शेवगाव ०६,श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०५, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ७७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा १२, अकोले ०५, जामखेड ०५, कर्जत ०३, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ११, नेवासा ०५, पारनेर ०२,  पाथर्डी १७, संगमनेर ०६, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले ०१, जामखेड ११, कर्जत १३, कोपरगाव ०५, नगर ग्रा.०७, पाथर्डी १५, राहाता ०१, शेवगाव १७, श्रीगोंदा १०, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post