निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या वचननाम्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करा

साईकिरण टाइम्स |११ नोव्हेंबर २०२०

अहमदनगर | दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतकऱ्यांवर असलेल्या या संकट काळामुळे त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या वचनननाम्याप्रमाणे शतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

मंत्री थोरात यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शेतकर्‍यांना गेल्या 10 वर्षापासून सातत्याने अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी आदि बाबींमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूमुळे पिकलेला शेतमालही कवडीमोल भावाने विकण्याची वेळी आली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतमालाला उत्पादन खर्चा इतकाही दर न मिळाल्याने तोट्यात विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आजही येत आहे. फडणवीस सरकारने अटी व शर्ती लादून केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ शेतकर्‍यांना झालेला नाही. त्यामुळे गेल्या १० वर्षापासून शेतकरी राष्ट्रकृत, व्यापारी, सहकारी, पतसंस्था, आदी बँकेचे कर्ज वरील बाबींमुळे थकलेले आहे. त्यामुळे त्यांना नवीन पिक कर्ज मिळणे कठीण झालेले आहे. याचा परिणाम दुदैवाने शेतकरी आत्महत्येमध्ये दिवसेनदिवस वाढ होत आहे. बँकांकडून शेतकर्‍यांना जप्तीच्या नोटीसा अथवा जप्तीची धमकी दिली जात आहे. व्यापारी बँकाकडून शेती कर्ज वाटतांना संबंधीत कर्ज खातेदारांकडून कोरे चेक घेतले आहे. परंतु सदर कर्जाचे हप्ते थकल्याने बँकाकडून चेक बँकेमध्ये टाकले जातात. खात्यावर पैसे शिल्लक नसल्याने चेक वटत नाही. त्यामुळे बँका भारतीय दंड विधान कलम ४२० अन्वये शेतकर्‍यांवर फसवणूकीचे गुन्हे दाखलकरीत आहे. या बाबींमुळे शेतकर्‍यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तरी सदर शेतकर्‍यांवर ४२० अनव्ये गुन्हे दाखल न करण्याचे आदेश पोलिसांना द्यावे. तसेच जिल्हा बँकेने चालू वर्षाकरिता राष्ट्रकृत बँक थकबाकी शेतकर्‍यांना पिक कर्ज देण्याचा एक चांगला निर्णय घेतला. परंतु राष्ट्रकृत बँकाकडून सेवा सोसायटीसाठी थकबाकीचे दाखले न दिल्याने सदर कर्जापासूनही वंचित राहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आलेली आहे. 

जिल्हा बँकेतील थकबाकी शेतकर्‍यांना आजपर्यंत कुठल्याही कर्जमाफीचा लाभ न झालेल्या व सेवा सोसायटीचे कित्येक वर्षापासूनचे थकीत कर्ज राईट ऑफ न झालेने ७/१२ उतार्‍यावर मालक सदरी सोसायटींच्या नोंदी लागले आहे. तरी सरकारने जाहिरनाम्याच्या प्रती क्षेत्राती, रक्कमेची, तारखेची थकबाकी, चालू बाकी, अशी कुठलीही अटी शर्ती न लादता सरसकट संपूर्ण कर्जमाफी करुन स्वातंत्र्य प्राप्तीनंतर किमान एकदातरी राज्यातील शेतकर्‍यांचा उतारा कोरा करावा ही विनंती. अन्यथा दिपावलीच्या दिवशी १४ नोव्हेंबर रोजी हजारो शेतकरी आपल्या दारात चटनी-भाकरी खाऊन दिवाळी साजरी करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post