साईकिरण टाइम्स | 31 ऑक्टोबर 2020
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केले. स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुयोग मंगल कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी आमदार कानडे बोलत होते.
प्रारंभी आ.कानडे यांनी स्व.इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले आणि ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी अनेक देशहिताचे निर्णय घेऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवला त्यामध्ये प्रामुख्याने गरीबी हटावचा नारा देऊन त्याकरिता वीस कलमी कार्यक्रम आखला. देशातील आर्थिक विषमता, स्त्री-पुरुष भेद यांसारख्या महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी विशेष लक्ष दिले. आणि देशासाठी आपले सर्वच्च बलिदान दिले असल्याचे त्यांनी म्हटले .
युवक काँग्रेसचे महासचिव तथा उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची बांग्लादेशच्या उभारणीवेळीची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. स्व.इंदिरा गांधी आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्यध्यक्ष सचिन गुजर यांनी प्रास्ताविक करत माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी आणि स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश घडविला व देशासाठीच्या दोन्ही नेत्यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला.
यावेळी जेष्ठ नेते जी.के पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे, पंचायत समिती सदस्य डॉ.वंदनाताई मुरकुटे, विजय शिंदे, जेष्ठ नगरसेवक दिलीप नागरे, जिल्हा काँग्रेसचे बाबासाहेब कोळसे, सुभाष तोरणे, समीन बागवान, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब आल्हाट, ऍड सर्जेराव कापसे, नवाज शेख, अल्पसंख्यांक विभागाचे दिपक कदम, अविनाश काळे, संजय गोसावी, अभिजित लिपटे, सनी मंडलिक, प्रताप गुजर यांच्यासह आदी उपस्थित होते. याप्रसंगी शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी मानले.