जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी रुबाब पटेल यांची निवड

साईकिरण टाइम्स | 9 ऑक्टोबर 2020

श्रीरामपूर तालूक्यातील सरला गोवर्धनपूर येथील आदर्श ग्रामसेवक रुबाब पटेल यांची श्रीरामपूर तालुका जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. 

श्रीरामपूर पंचायत समितीत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांचे हस्ते व अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील नांगरे यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर तालुका जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तालुका कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. ग्रामसेवक रुबाब पटेल यांचा ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post