समस्या सोडविण्यासाठी 'श्रीरामपूर तालुका साऊंड अँड लाईट सोशल असोसिएशन'ची स्थापना

साईकिरण टाइम्स | 14 ऑक्टोबर 2020

साऊंड व लाईट व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी 'श्रीरामपूर तालुका साऊंड अँड लाईट सोशल असोसिएशन'ची नुकतीच नोंदणी करण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

ही असोसिशन तालुका स्तरावरील साऊंड, लाईट व्यवसाय व्यावसायिकांच्या समस्या, अडी-अडचणी यांना वाचा फोडून त्या सोडविण्याचे कार्य करणार आहे. असोसिएशन स्थापन करण्यास तालुक्यातील साऊंड, लाईट, जनरेटर व्यावसायीकांनी मोलाचे सहकार्य केले. महाराष्ट्र राज्य साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशन व अहमदनगर जिल्हा साऊंड, लाईट ,जनरेटर असोसिएशन यांच्या अंतर्गत ही युनियन काम करणार असल्याचे सांगण्यात आले. असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी संजय थोरात, उपाध्यक्ष दत्तात्रय काळे, खजिनदार सागर झोटिंग, सचिव राकेश भावसार, संपर्क प्रमुखपदी वसीम शेख यांची निवड करण्यात आली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post