आमदार संग्राम जगताप यांनी घेतली युवा नेते करण ससाणे यांची भेट

साईकिरण टाइम्स | 15 ऑक्टोबर 2020

अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष  करण ससाणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आ.जगताप यांनी श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे व विधानपरिषद सदस्य आमदार अरुण जगताप यांच्या मैत्रीच्या नात्याला उजाळा दिला. विशेष करुन विधानपरिषद निवडणूक स्व.ससाणे व आमदार अरुण जगताप यांनी समोरा समोर लढवून देखील त्यांच्या मैत्रीत कधी दुरावा आला नाही. स्व. ससाणे यांचा वारसा उपनगराध्यक्ष करण ससाणे समर्थपणे चालवत असल्याचे आ.जगताप यांनी म्हटले. 

यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करुन स्वागत केले. आ.जगताप व करण ससाणे यांच्यात विविध विषयांवर जवळपास तासभार चर्चा झाली. प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्यध्यक्ष सचिन गुजर, पक्षप्रतोत संजय फंड, शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, रितेश रोटे पाटील,युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धार्थ फंड, सुहास परदेशी, प्रवीण नवले, पुंडलिक खरे, गोपाल लिंगायत, अभिजित लिपटे,  संजय गोसावी, योगेश गायकवाड, प्रताप गुजर, राजेश जोंधळे, अजय धाकतोडे, सिद्धांत छल्लारे, सागर दुपाटी, विवेक माटा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post