साईकिरण टाइम्स | 13 ऑक्टोबर 2020
राज्यातील मंदिरे उघडण्याकरिता भाजपाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य श्री तुषारजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत मंगळवारी (दि.13) एक दिवसीय 'लाक्षणिक उपोषण' करण्यात आले. उपोषण स्थळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील धार्मिक तीर्थस्थळे सुरु करण्याबाबत राज्यातील आघाडी सरकार उदासीन असून सरकारने दारूचे बार सुरु केले परंतू मंदिरे बंद केली. राज्यातील सर्वंच मोठं मोठ्या धार्मिक स्थळांवर अवलंबून असलेली हॉटेल व्यवसायिक, प्रसादालये, फुल हार व्यावसायिक या उदासीन सरकारमुळे अडचणीत सापडलेली आहेत. या काळ्या निर्णयाच्या निषेधार्थ प्रमुख साधू संतांच्या उपस्थितीत आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य श्री तुषारजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहरात एक दिवसीय 'लाक्षणिक उपोषण' आयोजित करण्यात आले होते.
त्याप्रसंगी उपोषण स्थळी आवर्जुन भेट देण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, खासदार भारतीताई पवार, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर , जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर , जिल्हा सरचिटणीस सुनिल वाणी, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन तांबे ,जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, जिल्हा उपाध्यक्ष सतिश सौदागर, जिल्हा कार्यकारणी सदस्य गजानन शिर्वेकर तालुका अध्यक्ष बबन मुठे , व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गोंदकर , युवामोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य किरण बोऱ्हाडे , राहाता तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर , शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे , युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश गोंदकर, योगिराज परदेशी , विशाल अंभोरे आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.