साईकिरण टाइम्स | 29 ऑक्टोबर 2020
भारतीय जनता पार्टीच्यावतीने भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. राज ढेरे व अकोला भाजप संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते वृक्षरोपनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
वृक्षरोपनाच्या या कार्यक्रमात एकूण ७० वृक्षांचे रोपन श्रीरामपूर तहसील कचेरीच्या मागे करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शहर व परिसरात एकूण ५ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला. त्याची सुरूवात या ७० वृक्षांच्या रोपणाने झाली.
यावेळे ढेरे म्हणाले, वृक्षांचे महत्व मणुष्याच्या आयुष्यात खूप मोठे आहे. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी वृक्षापासून मिळणाऱ्या ऑक्सीजनशिवाय पर्याय नाही. मात्र अलिकडे जागतिकीकरणाऱ्याचा युगात वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जाते. त्यामुळे अनेक व्याधी, रोगांनी मणुष्याला ग्रासले आहे. त्यामुळे आपल्या समाजाप्रती, देशाप्रती प्रेम असलेल्या प्रत्येकानेच वृक्षरोपण व संवर्धन करणे आता काळाची गरज बनली आहे.
वाकचौरे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वृक्षांचे महत्व जाणून घेत सर्वांना वृक्ष लागवडीचे आवाहन केले आहे. शिवाय त्यांनी आपल्या कृतीतूनही वेळोवेळी निसर्गाप्रती असलेले प्रेम दाखवले आहे. त्यामुळे देशात राहणाऱ्या प्रत्येक देशभक्ताचेदेखील हे प्रथम कर्तव्य आहे की, आपण आपल्या परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून देशाला उज्जवल भविष्या कडे घेऊन जाऊ. यावेळी उत्तर नगर जिल्हा उ्पाध्यक्ष गणेश राठी शहराध्यक्ष मारूती बिंगले, जिल्हा सांस्कृतिक सेल बंडुकुमार शिंदे आदींची भाषणे झाली.
समारंभास सरचिटणीस विजय लांडे. युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विशाल यादव, अक्षय वर्पे, आनंद बुधेकर, गणेश बिंगले, ओंकार झिरंगे, अमोल अंबिलवादे, रूपेश हरकल, भाऊसाहेब कणगरे, संदीप रन्नवरे, अक्षय नागरे, धिरज बिंगले, रामदास रन्नवरे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन बंडुकुमार शिंदे यांनी तर आभार विशाल यादव यांनी मानले.