अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८५ %

साईकिरण टाइम्स | 29 ऑक्टोबर 2020

अहमदनगर जिल्ह्यात आज २८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ५७९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४६२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३ आणि अँटीजेन चाचणीत १५२ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३२, जामखेड ०२, नगर ग्रामीण ०२, पाथर्डी ११, राहाता ०२, राहुरी ०२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०५, कॅंटोन्मेंट ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०,अकोले ०१, जामखेड ०१, कर्जत ०३, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०२, पारनेर ०१, राहाता ०३, राहुरी ०५, संगमनेर १०, श्रीगोंदा ०२,  श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १५२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा ०५, अकोले ०७, जामखेड १७, कर्जत १२, नगर ग्रामीण १९, नेवासा ०१, पारनेर ११, पाथर्डी २१, राहाता १५, राहुरी ०५, संगमनेर २१, शेवगाव ११, श्रीगोंदा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४१, अकोले १०, जामखेड १७, कर्जत १९, कोपरगाव ०१, नगर ग्रा १६, नेवासा ११, पारनेर २०, पाथर्डी १९, राहाता २३, राहुरी १८, संगमनेर २७, शेवगाव २७, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर १६, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post