हाथरस घटनेच्या निषेधार्थ नगरसेविका प्रणिती चव्हाण यांचे प्रांत कार्यालयात धरणे आंदोलन

साईकिरण टाइम्स | 6 ऑक्टोबर 2020

श्रीरामपूर | उत्तर प्रदेश येथील अनुसूचित जाती लोकसभा मतदार संघ असलेल्या हाथरस या जिल्ह्यात वाल्मिकी मेहतर समाजाच्या तरूणीचा काही तरूणांनी बलात्कार करून निघृण हत्याकांड घडवुन आणले. या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आज (दि.6) रोजी श्रीरामपूर तालुका प्रांत कार्यालयात  नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण श्री दीपक चरणदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व  श्रीरामपूर तालुका सकल पंचांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी सामाजिक बांधव महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक भाषणात श्री दीपक चरणदादा चव्हाण म्हणाले, हाथरसचे खासदार पिडीत कुटुंबियांना भेटुन मदत करने ऐवजी कारागृहात आरोपींची भेट घेतात तर उत्तर प्रदेश प्रशासन गुंड प्रवृत्तीला खतपाणी घालतात. याचा निषेध म्हणून 12 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण जिल्ह्यातुन समाज बांधवांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.   

यावेळी नगरसेविका सौ जयश्रीताई शेळके  योगेश बोरूडे, चेअरमन श्री प्रकाश सपकाळ, संजय झिंगारे, जेधे अंकुश, बंटी चव्हाण, अनिकेत दाभाडे, अक्षय चव्हाण, राजु दाभाडे, आनंद चावरे,झुंज, लखन दाभाडे, किरण सोळंकी,दिनेश बागडे, शंकर कंडारे, जिवन धनसिंग, राजु कचरे, राकेश खरारे, अजय बागडे, मुन्ना जेधे, अमर दाभाडे, भारत दाभाडे, चेतन बागडे, मयूर चव्हाण, राहुल कंडारे, रूपेश करोसिया, राकेश झिंगारे, सचिन चंडाले, राजु गोयर, सतिश गायकवाड, यशवंत चव्हाण, प्रसाद चव्हाण आदी उपस्थित होते. प्रास्ताविक श्री दीपक चव्हाण यांनी केले. श्री धनवटे सर,श्री अंतोन शेळके, राहुल आठवाल, आदी समाज बांधवांनी आपले तिव्र भावना व्यक्त केल्या. आभार नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण यांनी मानले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post