साईकिरण टाइम्स | 6 ऑक्टोबर 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) बेलापूर ग्रामपंचायतीने कचरा संकलन करण्यासाठी सुमारे 12 लाख रूपये खर्चून, खरेदी केलेली दोन वाहने महिन्यापासून उभी आहेत. ही वाहने त्वरित कार्यान्वित करून, त्याद्वारे कचरा संकलित करण्यात यावा, अशी मागणी अशोक कारखाण्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी ग्रामसेवक तगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की , ही वाहने खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च झाली असल्याने ती लवकरात लवकर कार्यान्वित होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सदर वाहनामध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलन करण्याची सुविधा आहे. जी सध्या कार्यान्वित असलेल्या वाहनामध्ये नाही. गावकऱ्यांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवण करावा यासाठी गावात गाडी फिरवून जनजागृती करण्यात यावी, अशी मागणीही खंडागळे यांनी प्रत्यक्ष निवेदन देताना ग्रामसेवक तगरे यांचेकडे केली आहे.