श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील साखर कामगार हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयास कोरोना संसर्गाच्या काळात प्रत्येकी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मशीन देऊन डावखर परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे, गौरवोद्गार कामगार हॉस्पिटलचे प्रमुख तथा कामगार नेते अविनाश आपटे यांनी केले.
येथील साखर कामगार हॉस्पिटलला माजी नगराध्यक्षा इंदुताई डावखर व नारायण डावखर यांचे चिरजीव रोहन डावखर व सौ. पल्लवी डावखर यांनी कामगार हॉस्पिटला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मशीन दिले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी हॉस्पिटलचे प्रमुख वैद्यकिय आधिकारी रविद्र जगधने, नारायण मोरे, वैभव सुरडकर, संदिप डावखर, पत्रकार अनिल पांडे, अमोल कदम आदि उपस्थित होते.
आपटे म्हणाले, रोहन डावखर परिवाराचे नेहमीच हॉस्पिटला योगदान असते. आज त्यांनी कोरोना संसर्गाच्या काळात गरज असलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मशीन दिले आहे. या मशीनचा फायदा रुग्नाना होणार आहे. हे मशीन छोटे असल्याने यास रुग्नवाहिकेतुनही याचा वापर करता येईल. डावखर परिवारने दाखवलेल्या सामाजीक बांधिलकी प्रेरणादायी आहे. यावेळी वैदकिय आधिकारी रविद्र जगधने यांनी आभार मानले.