प्रशासकीय भवन येथे धरणे आंदोलन प्रसंगी तहसिल प्रशासनाला निवेदन देताना सकल मराठा समाज श्रीरामपूरचे बांधव दिसत आहे.
_____________________________
साईकिरण टाइम्स | 10 ऑक्टोबर 2020
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर श्रीरामपूर तालुक्यतील सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासकीय भवन येथे आज (दि.10) मराठा समाजाचे धरणे आंदोलन नुकतेच पार पडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज राज्यभरात आक्रमक झाला आहे. ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लाखो, करोडोंच्या संख्येने शांततेत ५८ मूकमोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाची नोंद झाली आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने पुन्हा एकदा मराठा समाजाने आंदोलनांची सुरवात केली आहे. श्रीरामपूरात मराठा समाजाने प्रशासकीय भवन येथे धरणे आंदोलन करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने विद्यार्थी, युवकांचे शैक्षणिक व नोकरीविषयी नुकसान होत आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत शासकीय पातळीवर कोणतीही नोकर भरती अथवा परीक्षा होऊ नये. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकारने जागे होऊन निर्णय घ्यावा अशी मागणी सकल मराठा समाज श्रीरामपूरच्यावतीने करण्यात आली. यावेळी तहसीलदार श्रीरामपूर यांना समाज बांधवांनी निवेदन दिले.