राज्यात शेतकर्यांची लूट सूरू आहे. काॅग्रेस व राष्ट्रवादी नेते शेतकरी हिताचे निर्णय घेत आहेत का? असा सवाल उपस्थित करत, कृषी बाजार समिती, साखर कारखाने त्यांच्या ताब्यात आहे. शेतकरी हिताचा निर्णय घेण्यासाठी आपल्याला संघर्ष करून आरपारची लढावी लागेल. सत्ताधारी व विरोधक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांना कोणी विचारतं का? सत्तेसाठी ते काहीही करू शकता. ते खिश्याला बिल्ले लावून मिरवत आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी सोमवारी (दि.26) श्रीरामपूर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात केली.
रघुनाथ दादा पाटील पुढे म्हणाले, शेतकरी संघटना स्व.शरद जोशी विचारधारेची संघटना आहे. त्यांच्या विचारधारेतून प्रेरणा मिळते. जागतिक पातळीवर मदत मिळण्याची भूमिका काॅग्रेसने घेतली होती; हेच भामटे आता कृषी कायद्याला विरोध करत आहे. माथाडी कामगारचे नेते नरेद्र पाटील, शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे असून कायद्याला विरोध करत आहे. पुण्याच्या साखर आयुक्तालयावर पाच हजार शेतकरी चला, तुम्हाला ऊसाला चार हजार दोनशे रुपये भाव मिळून देतो आणि सातबारा कोरा करतो, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सध्या राज्यात राजकीय संघटनेच्या टोळ्या जमल्या आहे. त्यापासून आपल्याला बाजूला राहायला हवं. मोठ्या नेत्यांचा डोळा आकारी पडीत जमिनीवर असल्याने वडिलेपार्जित हक्काच्या जामीनी ताकदीशी मिळू देण्याची ग्वाही रघूनाथ दादा पाटील यांनी दिली
शेतकऱ्यांचे या शेतकरी संघटनेसाठी रक्त सांडले आहे. ताकद उभी करण्यासाठी शेतकर्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यातील एकट्या शेतकऱ्याने संघर्ष उभा करून आजवर नाशिक जिल्ह्यात आठ मका खरेदी केंद्रे सुरू केले असल्याचेही पाटील म्हणाले. यावेळी स्वाभिमानीचे ईश्वर दंरदले, अहमदभाई शेख, नारायण पवार, दादा चोरमल, जगन्नाथ कोरडे, भगवान जाधव, व्यंकटेश साठे, अशोक पवार, इंद्रभान चोरमल, बाळासाहेब राऊत आदी शेतकर्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. याप्रसंगी कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, रूपेद्र काले बाळासाहेब पटारे, तालुकाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप, अशोक पटारे, शिवाजी जवरे, हरीभाऊ तुवर, नारायण टेकाळे, बच्चू मोढे, विलास कदम, शरद आसने, बबन उघडे, कैलास कोळसे, सुदाम आसने, कडू पवार, सुदामराव औताडे आदी उपस्थित होते.