साईकिरण टाइम्स | 26 ऑक्टोबर 2020
अतिवृष्टीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राहुरी तालुक्यातील द्राक्ष, डाळींब, पेरु, आंबा या फळबागांचेही मोठे नुकसान झालेले असून, फळबागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी फळबाग शेतकऱ्यांनी नामदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहु कानडे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात फळबाग शेतकऱ्यांनी निवेदन दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, अति पावसामुळे डाळींब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळे खराब झाल्यामुळे ती रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. खराब हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांचेही नुकसान झालेले आहे, असे असाताना केवळ भुसार मालाचेच पंचनामे करण्यात आले. आम्हाला केवळ भुसार पिकाचेच पंचनामे करण्याचे आदेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे फळबाग उत्पादकांनी नामदार प्राजक्त तनपुरे व आमदार लहु कानडे यांच्याकडे दाद मागितली.
शासनाने फळबाग शेतकऱ्यानाही नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला असताना, राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यावरच अन्याय का, असा सवालही फळबाग उत्पादक रविंद्र खटोड, देविदास देसाई, नारायण जाधव, दिलीप जाधव, सुभाष दाते, महेबुब शेख, दिपक पांढरे, सतीश देठे, नबाजी जगताप, लक्ष्मण चव्हाण, वसंत लोखंडे, अशोक टाकसाळ, रोहीदास खपके, संजय जगताप आदिसह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.