श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील धनवाट शिवारातील तुपे वस्ती परिसरात बिबट्याच्या पावलांचे ताजे ठसे आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
____________________________________________
साईकिरण टाइम्स | 24 ऑक्टोबर 2020
अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर पुन्हा वाढला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परीसरात नुकतेच बिबट्याच्या पावलांचे ताजे 'ठसे' आढळल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या परिसरात वनविभागाने पिंजरे लावावे, अशी मागणी पून्हा जोर धरू लागली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परीसरात बिबटयाचा वावर वाढल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील धनवाट परीसरात तुपे वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या ठिकाणी सध्या कापूस वेचणीचे काम सुरू आहे. शेतकर्यांसह मोलमजूरी करणारे कामगार कापूस वेचणी करत आहे. तुपे वस्तीनजीक, चंद्रशेखर पावसे यांच्या शेडजवळ बिबटयाचे ठसे आढळले आहे. त्यांच्या शेडच्या जाळीचे पक्के बांधकाम असल्यामूळे बिबट्याला जाळीत प्रवेश करत आला नाही. अन्यथा, बिबट्याने शेळी किंवा गायांवर हल्ला केला असता. उक्कलगाव येथील लम्हाणबाबा शिवार व धनवाट परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी चंद्रशेखर पावसे, भारत निवृत्ती थोरात, बाबासाहेब तांबे आदींसह शेतकर्यांनी वनविभागाकडे केली असल्याचे सांगण्यात आले.