श्रीरामपूरात शेतकरी संघटनेचा कर्जमुक्ती मेळावा : रघुनाथदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती


साईकिरण टाइम्स |24 ऑक्टोबर 2020
 

सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंगल कार्यालयात कर्जमुक्ती मेळव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिली आहे.

कार्यक्रमासाठी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, बळीराजा क्रांतीसीह नाना पाटील ब्रिेगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, राज्य सचिव रूपेंद्र काले, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब पटारे यांची प्रमुख उपस्थिती आहे. केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेला शेतकरी बील, शेतमाल नियमन मुक्ती, व्यापार वाणिज्य, फार्मर ॲण्ड प्रोड्यूसर कंपन्या, हमी भाव, बाजार समित्या याबाबत सविस्तर मार्गदर्शनासह सरकारची सातत्याने होत असलेली निकष, अटी शर्ती लादून केलेली फसवी कर्जमाफी तसेच गाळप हंगाम २०२०-२१ ऊसदर, त्याच बरोबर जिल्ह्यातील अकारी पडीत शेतजमिन याबाबतही मार्गदर्शन होणार असून आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

जिल्हा पदाधिकारी अशोक पठारे, युवराज जगताप, शिवाजी जवरे, अहमदभाई जहागिरदार, हरिभाऊ तुवर, बच्चू मोठवे, नारायण टेकाळे, विलास कदम, शरद पवार, बबनराव उघडे, राजू गोर्डे, भास्कर तुवर, कैलास पवार, दिलीप औताडे, कडू पवार, नारायण पवार, संदीप उघडे, बाळासाहेब कदम, मनोज औताडे, बच्चू मोढे, आदी कार्यकत्यारनच्या वतीने शेतकऱ्यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल औताडे व युवा आघाडी अध्यक्ष शरद आसणे यांनी केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post