श्रीरामपूर | रोटरी क्लब श्रीरामपूरच्यावतीने आझाद मैदान येथे पोलिओ जनजागृती रॅलीचे शुभारंभ नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी क्लबचे अध्यक्ष डॉ. भारत गिडवाणी ,सचिव हरसुख पदमाणी , कामगार नेते अविनाश आपटे , प्रक्लप प्रमुख अनिल पांडे , राजेश कुंदे, गणेश देशपांडे, विशाल कोटक, सरबजीतसिंग चुग, पप्रम नारा, हितेश तलरेजा,क्रिषना पदमानी, विशाल मेंगले आदि उपस्थित होते. (छाया-अनिल पांडे)
_____________________________________
साईकिरण टाइम्स | 24 ऑक्टोबर 2020
जागतिक पातळीवर रोटरी क्लबने पोलिओ या महाभयंकर रोगाचा समूळ उच्चाटनासाठी भरीव अशी कामगिरी केली आहे. श्रीरामपूर येथीलही रोटरी क्लब सामाजिक कार्यात आग्रेसर असल्याचे, प्रतिपादन श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.
रोटरी क्लब श्रीरामपूरच्यावतीने आझाद मैदान येथे पोलिओ जनजागृती फोर व्हीलर रॅलीचे शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक बोलत होत्या. यावेळी क्लबचे अध्यक्ष डॉ. भारत गिडवाणी ,सचिव हरसुख पदमाणी , कामगार नेते अविनाश आपटे , प्रक्लप प्रमुख अनिल पांडे , राजेश कुंदे, गणेश देशपांडे, विशाल फोफळे, उल्हास धुमाळ, विशाल कोटक, सरबजीतसिंग चुग, पप्रम नारा, हितेश तलरेजा,क्रिषना पदमानी, विशाल मेंगले यांच्यासह क्लब सदस्य उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, गेले ४५ वर्षेपासुन रोटरी क्लब श्रीरामपूर विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. समाजाची नेमकी गरज ओळखून त्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्याचा रोटरी क्लब ,श्रीरामपूर नेहमीच प्रयत्न असतो. क्लबचे अध्यक्ष डॉ.भारत गिडवाणी म्हणाले, कोरोनामुळे आजची रॉली प्रशासानाच्या qवनतीवरुन रद्द करण्यात आली आहे. याऐवजी जागेवरच सर्व कार्यक्रम घेतला आहे. पोलिओ जगातुन जावा यासाठी रोटरी सतत कार्यरत राहिले आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अनिल पांडे यांनी केले. आभार सचिव हरसुख पदमानी यांनी मानले.