नगर जिल्ह्यात आता 'नो मास्क नो रेशन'


साईकिरण टाइम्स | 6 ऑक्टोबर 2020

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता विनामास्क आपण जर स्वस्त धान्य दुकानात रेशन घेण्यासाठी गेला तर आपल्याला रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे. 'नो मास्क नो रेशन' असा निर्णय जिल्हा धान्य दुकानदार संघटनेने घेतला असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असुन स्वस्त धान्य दुकान चालकही कोरोनाच्या विळख्यात सापडलेला आहे. अनेक दुकानदारांना कोरोनाची बाधा झालेली आहे. संगमनेर, राहुरी, पाथर्डी , श्रीरामपुर , कोपरगाव,  नेवासा या तालुक्यातील दुककानदारांना कोरोनाची बाधा झाली आहे . अनेक जण त्यातुन सुखरुप घरी परतले आहेत तर काही दुकानदारावर अजुनही उपचार सुरुच आहेत. काहींना तर वेळेवर बेड पण मिळाले नाही. रेशन दुकानातुन धान्याचे वाटप करत असताना येणाऱ्या प्रत्येक कार्डधारकाचा अंगठा हातात धरुनच पाँज मशिनवर ठेवावा लागतो. त्यानंतरच तो अंगठा जुळतो हे करत असताना कोण व्यक्ती कशी असेल ते ही सांगता येत नाही. दुकानदाराने जरी काळजी घेतली तरी एखादा बाधीत रुग्ण आल्यास संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे रेशन खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाने देखील आपली व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहीजे. 

यासंकट काळात सर्व जण घरीच बसलेले असताना धान्य दुकानदार हा जिव मुठीत धरुन धान्याचे वाटप करत होता. हे करत असताना राज्यातील ३५  दुकानदारांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता प्रत्येकाला आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी ओळखुन नियमांचे पालन करुनच सर्व कामे करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्क घालुनच घराबाहेर पडावे. आता रेशनचे धान्य खरेदी करीता येणाऱ्या ग्राहाकासाठी मास्क सक्तीचे केले जाणार आहे. आता या पुढे 'नो मास्क नो रेशन' ही संकल्पना सर्व दुकानदार राबविणार असुन रेशनचे धान्य खरेदीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क घालुनच धान्य घेण्यासाठी यावे, असे अवाहनही अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, सचिव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, विश्वासराव जाधव , बाळासाहेब दिघे ,  सुरेशराव उभेदळ , ज्ञानेश्वर वहाडणे , गणपतराव भांगरे , गजानन खाडे , कैलास बोरावके , बजरंंग दरंदले ,माणिक जाधव , बाबा कराड , रावसाहेब भगत , बाबासाहेब ढाकणे , मोहीते पाटील आदिंनी केले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post