श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रेणुका देवी मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिराच्या भव्य कळसास व सभामंडपास नवी झळाळी देण्यात आली आहे. नवरात्र मात्र साध्या पद्धतीने साजरे होणार असून देवी दर्शन ऑनलाईन होणार आहे. (छाया- आदित्य जोशी)
___________________________________
साईकिरण टाइम्स | 11 ऑक्टोबर 2020
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रेणुका देवी मंदिरास कोरोना कालावधीत मंदिर बंद असल्याने अंतरंग व बाह्यरंग बदलून मंदिरास नवी झळाळी देण्यात आली आहे, असे असले तरी कोवीड १९ प्रादुर्भावामुळे यंदा नवरात्र मात्र, साध्या पद्धतीने साजरे होणार असून देवी दर्शन ऑनलाईन होणार असल्याची माहिती, आश्रमाचे संस्थापक व प्रमुख सदगुरू रेवणनाथ महाराज यांनी दिली आहे.
तिर्थक्षेत्र देवगडच्या धर्तीवर लाॅकडाऊन काळात मंदिर परिसर विकास व सुशोभिकरण हाती घेण्यात आले होते. श्रीरामपूर येथील रेणुका कंस्ट्रशनचे महेश भगणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळघरात येणार पाणी बंद करण्यासाठी प्रतिबंधात्मक ऊपाय करण्यात आले. प्रदक्षिणा मार्ग दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले,भव्य शिखर,सभामंडप रंगरंगोटी करण्यात आली.आतील रंग तब्बल पंचवीस वर्षांनी बदलण्यात आला आहे. असे असले तरी कोवीड १९प्रादुर्भाव मुळे नवरात्र साध्या पद्धतीने साजरे होणार आहे.
शासनाच्या व शहर पोलीस स्टेशनच्या आदेशानुसार मोजक्या उपस्थितीत व सामाजिक अंतर राखून पारंपरिक धार्मिक विधी पार पडणार आहे. या नुसार शनिवार दिनांक १७ऑक्टोबर रोजी सकाळी राजराजेश्वरी रेणुका देवी अभिषेक महापूजा होऊन विधीवत घटस्थापना व सप्तशती पाठ प्रारंभ होणार आहे. ललिता पंचमीस कुंकुम अर्चन,दुर्गाष्टमीस महाऊपवास व फुलोरा होईल.शनिवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दुपारी यज्ञ यजमान जोडी व फक्त पुजारी, पुरोहित उपस्थितीत होम हवन व सायंकाळी पूर्णाहूती होईल. सालाबादप्रमाणे विजयादशमीस शमी व शस्त्रपूजनाने नवरात्र सांगता होईल. भाविकांनी आपापल्या घरीच पारंपरिक पद्धतीने कुळधर्म,कुलाचार व नित्य ऊपासना करून नवरात्र साजरे करावे.आश्रमाचे पुजा विधी नित्य आरती आश्रमाची वेबसाईट, युट्यब चॅनल, फेसबुकपेजवर पहायला मिळणार आहे.
त्यामुळे मंदिराच्या गाभार्यात पुजारी व पुरोहिताशिवाय कोणालाही प्रवेश नसल्यामुळे भाविकांनी गर्दी करू नये, आपापल्याला घरीच राहून कोरोना महामारी संकट दूर होवो यासाठी आदिशक्तीची नऊ दिवस नित्य ऊपासना करावी असे आवाहन श्री रेणुका भक्त मंडळ परिवारातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, श्री रेणुका भक्त मंडळ परिवार या आश्रमाच्या अधिकृत "व्हाॅटसअॅप" ग्रुपमध्ये नित्य पूजा -आरतीचे फोटो, व्हिडिओ, शक्ती ऊपासना माहिती पाठविली जाणार आहे ज्या भाविकांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी रेणुका आश्रमाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.