साईकिरण टाइम्स | 2 ऑक्टोबर 2020
श्रीरामपूर तालुक्यातही कोरोना रुग्णांची वाढता प्रसार रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट होणे गरजेचे आहे. केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने सुरु केलेल्या घरी जाऊन कोरोना चाचणी करण्याच्या सुविधेचा संशयित रुगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.
श्रीरामपूर तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या सहकार्यातून केमिस्ट भवन, हरिकमल प्लाझा येथे अपोलो डायग्नोस्टिक्स, क्षितीज डायग्नस्टिकक्सच्या सुरू करण्यात आलेल्या कोरोना चाचणी (RT-PCR) नमुना संकलन केंद्राचा शुभारंभ प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या शुभहस्ते तर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष रविंद्र गुलाटी, असो.चे अध्यक्ष उदय बधे, सचिन चुडीवाल, केमिस्टचे सचिव, क्षितीज डायग्नोस्टिक्सचे सुजित राऊत उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, कोरोना चाचणी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना केमिस्टमुळे चांगली सुविधा निर्माण झाली आहे. नागरिकांना चाचणी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज नसल्याने केमिस्ट व क्षितीज डायग्नोस्टिक्स माध्यमातून सुरू होत असलेल्या या उपक्रमाचा श्रीरामपूर शहर व तालुक्यातील संशयित रुग्णांनी लाभ घ्यावा.
तहसीलदार पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकटात केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कोरोना योद्धे म्हणून काम करत आहे. चाचणी संख्या वाढल्यास नक्कीच कोरोनाला थांबविणे शक्य होऊ शकते.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष गुलाटी म्हणाले की, कोरोना संकटात केमिस्ट असोसिएशन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर आहे. भविष्यती प्लाझ्मा डोनेशनसाठी केमिस्ट असोसिएशन पुढाकार घेणार आहे. सर्दी, खोकला, ताप, कोरोना संशयित रुग्णांनी तात्काळ केमिस्ट भवन येथे संपर्क करावा. टेक्निशियन त्यांच्या घरी येऊन चाचणी घेऊन जातील. तर केमिस्टचे सचिव, क्षितीज डायग्नोस्टिक्सचे सुजित राऊत यांनी श्रीरामपूरकरांच्या आरोग्य हितासाठी क्षितीजच्या वतीने कोरोना चाचणी नमुना संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. संशयित रुगांची तपासणी करून लवकर रिपोर्ट देण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे म्हणाले. यावेळी केमिस्टचे ओम नारंग, बाळासाहेब ढेरंगे, रवींद्र चौधरी, प्रशांत उचित, आनंद कोठारी, विठ्ठल शिंदे, नितीन देशमुख, दीपक उघडे, दिनेश बनसोडे, जालिंदर भवर, तलाठी खर्डे रावसाहेब आदी उपस्थित होते.