साईकिरण टाइम्स | 2 ऑक्टोबर 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रपिता महात्मा गांधी , भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंंती व अंगणवाडीच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्राथमिक शाळा,अंगणवाडीत 'बेटी बचाव, बेटी पढाव' या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले.
भारत सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत 2 अॉक्टोबर 1975 रोजी अंगणवाडीची स्थापना केली. त्याला आज 45 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर 'बेटी बचाव , बेटी पढाव' या कार्यक्रमा अंतर्गत पर्यवेक्षिका शिंंदे मॕडम यांच्या हस्ते नुकत्याच जन्मलेल्या मुलीचे स्वागत करून त्यांच्या मातांना मार्गदर्शन केले. अंगणवाडीच्या मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात फेरी काढण्यात आली. यावेळी बेटी बचाव , बेटी पढाव ! महात्मा गांधी की जय ! जय जवान , जय किसान ! अशा घोषणा देण्यात आल्या. अंगणवाडी सेविका सौ.मंदाकिणी शेलार, मदतनीस श्रीमती प्रभावती भांड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पर्यवेक्षिका शिंंदे मॕडम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिला पालक उपस्थित होत्या.