ऊर्दू मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्याची मागणी

साईकिरण टाइम्स | 8 ऑक्टोबर 2020

श्रीरामपूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील उर्दू शाळातील रिक्त मुख्याध्यापकांची पदे मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापक पदोन्नती बरोबरच करण्यात यावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य ऊर्दू शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे.

 उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरफोद्दीन शेख, सरचिटणीस नवेद मिर्झा, सल्लागार अजीज यासीन शेख, उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण व सचिव आबिद खान आदीनी जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण यांची भेट घेऊन जिल्ह्यातील उर्दू शाळांच्या समस्या बाबत सविस्तर चर्चा केली . यामध्ये मुख्याध्यापकांची रिक्त पदे त्वरित भरावीत तसेच ऊर्दू शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी असल्यामुळे शिक्षक भरती नजीकच्या काळात होण्याची शक्यता नसल्याने जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदेच्या विशेषाधिकारामध्ये शाळांना उर्दू शिक्षक उपलब्ध करून द्यावे . स्वाध्याय पुस्तिका सर्व शाळांना मिळाव्यात,उर्दू शाळांमध्ये शिक्षक संख्येचा असमतोल पाहता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिकारांमध्ये विशेष बाब म्हणून ऊर्दू शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे या प्रश्नावर चर्चा केली .उपशिक्षणाधिकारी पठाण यांनी ऊर्दू मुख्याध्यापकांची रिक्तपदे भरण्याबाबत माहिती अद्ययावत करण्याचे आदेश शिक्षण विभागातील लेखिकांना दिले . श्रीरामपुर पंचायत समिती मध्ये इतर मागासवर्ग व विमुक्त जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपात झालेल्या अन्यायाबाबत ही संघटनेने त्यांचे लक्ष वेधले.

यावेळी उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री पठाण यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला .जिल्ह्यातील उर्दू शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे . याबाबत संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन पठाण यांनी केले .प्रास्ताविक शर फोद्दीन शेख यांनी केले तर आभार नवेद मिर्झा यांनी मानले . यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अलीम शेख ही उपस्थित होते .

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post