काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा श्रीरामपूर 'काँग्रेस'कडून निषेध


साईकिरण टाइम्स | 2 ऑक्टोबर 2020

उत्तर प्रदेश मध्ये घडलेल्या घटनेचा श्रीरामपूर 'काँग्रेस'कडून आमदार लहू कानडे व युवा नेते करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली कँडल मार्च काढून निषेध करण्यात आला.

यावेळी बोलतांना उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली या घटनेतील पीडिताला न्याय मिळावा यासाठी व देशाचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी हे त्या कुटुंबीयांना सांत्वना देण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करून अटक केली या घटनेचा आम्ही निषेध करतो. देशात सध्या लोकशाही पायदळी तुडवत हुकूमशाही कारभार चालू असल्याची टिका ससाणे यांनी केली आहे.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्यध्यक्ष सचिन गुजर बोलत होते की, देशाच्या जडण घडणीत गांधी कुटुंबाचे मोठे बलिदान आहे. ज्या कुटूंबातील सदस्यांनी देशासाठी अंगावर गोळ्या झेलत आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना या धक्काबुक्कीची काय भिती असणार असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी उत्तरप्रदेश मधील योगी सरकारचा निषेध व्यक्त केला. ज्या पद्धतीने पीडित मुलीची व तिच्या कुटुंबियांची हेळसांड केली त्यांना जनता कदापि माफ करणार नाही आमचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यावर हल्ला करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आश्या भ्याड हल्याना काँग्रेस दापि भिक घालणार नसल्याचं म्हटले आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, शहराध्यक्ष संजय छल्लारे, जिल्हा काँग्रेसचे सुभाष तोरणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिध्दार्थ फड,  नगरसेवक मनोज लबडे, रितेश रोटे पाटील, समीन बागवान,सेवादल काँग्रेसचे रावसाहेब आल्हाट, रियाज पठाण, प्रवीण नवले, जफर शहा, गोपाल लिंगायत, मनीष पंचमुख, सनी मंडलिक, प्रताप गुजर, योगेश बडघे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post