साईकिरण टाइम्स | 11 ऑक्टोबर 2020
बेलापूर (प्रतिनिधी) 11 ऑक्टोबर हा बालिका कन्या दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. 11 ऑक्टोबर 2012 रोजी पहिला जागतिक बालिका कन्या दिवस साजरा केला गेला. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अंगणवाडीेत 'बालिका कन्या दिवस' मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी स्त्री जन्माचे स्वागत , बेटी बचाव बेटी पढाव, सायकल रॅली असे कार्यक्रम घेण्यात आले. स्त्री-भ्रूण हत्या रोकली जावी तसेच मुलांप्रमाणे मुलिंनाही सर्व क्षेत्रात समान हक्क प्राप्त व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पर्यवेक्षिका शिंदे मॕडम यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका कविता वर्मा, गजरा आतार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी छोट्या बालिका उपस्थित होत्या.