साईकिरण टाइम्स | 12 ऑक्टोबर 2020
संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील डाॅ. योगेश संभाजी तोरकडी हे निजाम आयुविज्ञान संस्था हैदराबाद येथे Mch ( Urology ) मुत्रविकारतज्ज्ञ परीक्षेत नुकतेच विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाले आहे.
डाॅ. योगेश तोरकडी यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजापूर तर माध्यमिक शिक्षण सह्याद्री विद्यालयात पुर्ण केले. एम.बी.बी.एस हे केईएम हाॅस्पिटल मुंबई तर एम.एस ( सर्जरी ) जे.जे.हाॅस्पिटल मुंबई येथे पुर्ण केले आहे.
संगमनेर येथील केंद्रप्रमुख कै.संभाजी तोरकडी व प्राथमिक शिक्षिका प्रभावती तोरकडी यांचे ते चिरंजिव आहेत तर डाॅ. शैलेश तोरकडी यांचे बंधू होत. त्यांच्या या यशाबद्दल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , आ.डाॅ. सुधीर तांबे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे