साईकिरण टाइम्स |2 ऑक्टोबर 2020
यावेळी लाल निशाणच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात तात्काळ कडक कायदा तयार करून, जस्टीस वर्मा यांनी शिफारस केलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक असताना केंद्र सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. नराधमांनी सामूहिक बलात्कार करून अब्रूची लचके तोडले आहेत. त्या मुलीवर अत्याचार झाल्यावर पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. तिला वेळेत उपचारही मिळाले नाहीत. या पुढे जात अजून कळस करत पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला अत्यसंस्कारही करु न देता रात्रीच्या अंधारात मोठ्या पोलीस फौजफाट्यासह पोलिसांनी अंत्यसंस्कार स्वतःच केले. मुलीचे कुटुंब अंत्यसंस्कारासाठी गयावया करत होते तरीही तेथील सरकारने व प्रशासनाने त्यांना अंत्यसंस्कार करू दिले नाहीत या निर्दयी कृत्यातून सरकारने व प्रशासनाने मानवतेची हत्या केलेली आहे. अशा निर्दयी उत्तर प्रदेश सरकारचा व प्रशासनाचा लाल निशाण पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
देशातील महिलांवरील वरील वाढत्या अत्याचाराला आळा घालून आरोपींना कठोर शासन व्हावे याकरता कडक कायदे करण्यात यावेत. जस्टीस वर्मा समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी व या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत निष्क्रिय योगी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा तसेच संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांवर खडक कायदेशीर कारवाई करावी अन्यथा लाल निशाण पक्षाच्यावतीने देशभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी निवेदनात देण्यात आलेला आहे.
यावेळी लाल निशाण पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कॉ. जीवन सुरुडे, कॉ.श्रीकृष्ण बडाख, राहुल दाभाडे, अहमदभाई जहागिरदार, अमरप्रितसिंग सेठी, जोयेब जमादार, लखन डांगे, अजय बत्तीशे, साजिद मिर्झा, अमोल सोनवणे,दिनेश तुसंबड,राकेश झिंगारे,अमोल मरसाळे, लखन जाधव, आकाश शेळके,संजय सौदागर आदी उपस्थित होते.