साईकिरण टाइम्स | 4 ऑक्टोबर 2020
रंगलहरी कला ॲकॅडमीच्यावतीने चित्रकार भरतकुमार उदावंत व व्यंगचित्रकार रवी भागवत यांनी लॉकडाऊनच्या काळात कला रसिकांसाठी अनेक उपक्रम राबविले. यापूर्वी श्रीरामपूर येथील कला दालनात हे उपक्रम राबविले जात होते. मात्र आता कोरोना महामारीच्या काळात सर्व विद्यार्थ्यांन घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने या कलेचा आनंद लुटता यावायासाठी उदावंत व भागवत यांची धडपड सुरू असते. त्याचाच एक भाग म्हणनून नुकतेच राज्याभरातील बाल कलाकारांसाठी या जोडीने मोफत कार्टून वर्कशॉप आयोजित केले होते. त्यास राज्यासह दिल्ली, बंगळूर, हायद्राबाद, उत्तर प्रदेश आदी राज्यात स्थाईक असलेल्या मराठी विद्यार्थ्यांनी देखील मोठा प्रतिसाद दिला.
या शिबिरात अंकांपासून विवधि प्राणी, विविध अक्षरांपासून व्यंगचित्र कसे साकारता येते, शिवाय भुमितीतील पायाभूत आकारांपापासून कार्टून्सचा जन्म कसा होतो याची अनेक प्रात्यक्षिके भागवत यांनी झूम ॲपद्वारे सादर केली. कार्यशाळेत सहभागी बालकलाकारांनी देखील त्यांच्यासोबत चित्रे काढून आपला आनंद द्विगुनित केला.
उदावंत व भागवत यांनी एप्रिलपासून घेतलेल्या अनेक शिबिरांमध्ये हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळाली. या शिबिरामध्ये शिकलेल्या अनेक विद्यार्थी आता हुबेहुब चित्रे काढतात. लॉकडाऊनमध्ये नकारात्मता पसरलेल्या वातावरणात चित्रकलेमुळे मिळालेल्या उर्जेतून अनेकांनी सकारात्मकतेची कास धरली, असल्याचे उदावंत व भागवत सांगतात.