साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली "गाव तेथे काँग्रेस" हे अभियान सुरु असून या संदर्भात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची महत्त्वपूर्ण बैठक नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शुक्रवारी दि.४ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत सुयोग मगंल कार्यालय येथे होणार असुन सदर बैठकीस जेष्ठ नेते जी.के पाटील, माजी सभापती इंद्रभान थोरात, मार्केट कमिटीचे माजी सभापती सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, पक्षप्रतोत संजय फड, माऊली प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर मुरकुटे उपस्थित राहणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक व शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने सुरु केलेले गाव तेथे काँग्रेस अभियान श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सप्टेंबर २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधी सूत्रबद्ध पध्दतीने तालुका पातळीपासून जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण ते गावं पातळी पर्यंत काम करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक साखळी निर्माण करुन प्रत्येक गावांत काँग्रेस पक्षाची ग्राम शाखा निर्माण करणेकरिता वरील मान्यवरांच्या उपस्थितीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न होत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घेतल्यापासून नामदार बाळासाहेब थोरात यांनी विविध योजना यशस्वीरित्या राबवत काँग्रेस मध्ये नवं संजवनी आणली आहे. त्यामुळेच प्रदेश काँग्रेस काँग्रेस कमिटीने चालू केलेले गाव तेथे काँग्रेस अभियान नक्कीच संघटन वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
याबरोबच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने कोरोना आजारासह, अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे नमूद केले असून कोरोना आजराच्या पार्श्वभूमीवर सदरच्या बैठकीत फक्त निमंत्रित सदस्यांनीच येण्याचे आवाहन अरुण पाटील नाईक व संजय छल्लारे यांनी केले आहे.