साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 सप्टेंबर 2020
नेवासा (प्रतिनिधी) पुणे येथील टिव्ही ९ वृत्तवाहिनीचे पञकार पांडूरंग रायकर यांचा कोरोनामुळे झालेल्या मृत्युस जबाबदार आसणाऱ्या व प्रशासनातील हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन, रायकर कुटूबिंयांना त्वरीत शासकिय मदत करण्याची मागणी, नेवासा तालूका पञकार एकता संघाच्यावतीने नेवासा तहसिलदार रुपेश कुमार सुराणा यांना एका निवेदनाव्दारे करण्यात आली.
यावेळी नेवासा तहसिलदांराना दिलेल्या पञकार संघाच्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. रायकर यांना वैद्यकिय सेवा व सुविधा वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचे दुर्देवी निधन झाले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रायकर यांची प्रकृती खलावत असतांना त्यांना वेळेत सेवा व सुविधा न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्देवी अंत झाला याला कारणीभुत असणाऱ्या प्रशासनातील अधिकारी तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या पुणे , कोपरगाव येथील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन रायकर कुटूंबियांना तातडीने शासकिय मदत देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली.
या निवेदनावर नेवासा तालूका एकता पञकार संघाचे अध्यक्ष संदिप गाडेकर,सुनिल गर्जे,राजेंद्र वाघमारे,ज्ञानेश्वर जाधव ,मकरंद देशपांडे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे,,अदिनाथ म्हस्के,अशोक तुवर,रमेश शिंदे,शंकर नाबदे ,पवन गरुड, केंद्रिय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड,उमाकांत भोगे संतोष टेमक आदींच्या सह्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लोकशाहीचा चौथ्था स्तंभ असणारा पञकार कोरोनाच्या महामारीतही वृत्तसंकलन करण्यासाठी जीवाची पर्वा न करता पुढे जावून जनतेला घरबसल्या माहीती पुरवतो असतो.अशा वेळी पञकारच कोरोनाचा शिकार झाला सत्य बात्तम्या देत असल्याने प्रशासनातील काही लोकांनी जाणिवपुर्वक रायकर यांना सुविधा दिलेल्या नसल्याची चर्चा आहे याची सखोल चौकशीही महाराष्ट्र शासनाने करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी नेवासा तालूका पञकार एकता संघाचे अध्यक्ष संदिप गाडेकर यांनी केली आहे.
जिल्ह्याचे भुमिपुत्र ग्रामीण भागातील पांडुरंग रायकर यांनी जिल्ह्याची ओळख राज्यामध्ये चांगल्या कामामुळे झाली.अगोदर वृत्तपत्र क्षेत्रात केलेल्या चांगल्या कामाने पुढे इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये चांगल्या कामाने अनेक प्रश्नांना न्याय दिला. त्यांच्यावर अशी वेळ यावी हे मोठं दुर्दैव आहे. कोपरगाव, तसेच पुणे येथील डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन कुटुंबाला पन्नास लाखांची मदत करावी.
--- बाळासाहेब नवगिरे, जिल्हाप्रमुख, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना, अहमदनगर जिल्हा.