साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान व संसदीय संघाने जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या महामारीच्या काळात आपले सर्वस्व अर्पण करून सर्वसामान्यांच्या जीवीताच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या श्रीरामपूर नगर पालिका व कर्मचाऱ्यांचा " वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरीयर्सस अवार्ड " देऊन सन्मान केला.
सर्व प्रकारचे सुरक्षेचे नियम पाळून नगरपालिका सभागृहात झालेल्या या छोटेखानी समारंभात डब्ल्यूसीपीएच्या वतीने नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व तळमळीने कार्य करणाऱ्या १५ कर्मचाऱ्यांचा वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरीयर्सस अवार्ड " व लेविन भोसले लिखीत " वेध : सामाजिक जाणीवांचा " हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी डब्ल्यूसीपीए करीत असलेल्या कामाचे कौतुक करून डब्ल्यूसीपीएचे आभार मानताना वर्ल्ड पार्लमेंटने गुणवतांचा सन्मान करून एक आगळे वेगळे उदाहरण उभे केले आहे व त्यामुळे भारावून गेले आहे, असे कौतुकाचे उदगार काढले.
या प्रसंगी डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र (श्रीरामपूर) चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे, डब्ल्यूसीपीएचे स्थानिक सल्लागार अनिलराव पाटोळे, रिपब्लिकन पार्टीचे महेंद्र त्रिभुवन (अंकल ), सामाजिक कार्यकर्ते बबलू गायकवाड, उज्वल चव्हाण व श्रीरामपूर नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.