शिक्षण पध्दतीत गुणांपेक्षा गुणवत्तेवर शिक्षकांनी भर देणे आवश्यक; डॉ. शेकोकार

राहूरी फॅक्टरीत वेबिनार माध्यमातून शिक्षक दिन साजरा
साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 सप्टेंबर 2020
राहूरी फॅक्टरी | प्रतिनिधी | सध्याचा स्पर्धेच्या आधुनिक काळातील शिक्षण पद्धतीत विशेषतः विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी करत असताना गुणांपेक्षा व गुणवत्तेवर आधिक भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विभाग विद्यापीठ मंडळाचे अध्यापक मंडळ सदस्य डॉ.अनंतकुमार शेकोकर यांनी केले.

            ५ सप्टेंबर रोजी डॉ.शेकोकार यांनी घडवलेल्या मागील २० वर्षांच्या कालावधीतील आजी- माजी विद्यार्थ्यांनी वेबिनारच्या माध्यमातून शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक व विद्यार्थ्यांमधील सुसंवाद कशाप्रकारे वाढविता येईल याबाबत उपक्रम राबविला. डॉ.शेकोकर यावेळी म्हणाले की, आजच्या काळात विद्यार्थ्यांना पदवी व त्यावर आधारित क्रमांकावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या उपजत गुण व अभ्यास क्रमाच्या माध्यमातून पोषक वातावरणातुन प्राप्त झालेले कौशल्य यास अधिकाधिक चालना देण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न केले पाहिजे असे डॉ.शेकोकर म्हणाले. यावेळी डॉ.कांचन शेकोकर उपस्थित होत्या.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post