काळानुरुप शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत बदल करावा; संजय जोशी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | काळानुरूप सर्व शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत बदल करावा व सर्व आवाहनांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. शिक्षणाचे समाजातील स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव श्री संजय जोशी यांनी केले. 

         येथील भि.रा.खटोड कन्या विद्यालयात  शासकीय नियमाचे पालन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे सहसचिव व विद्यालयाचे चेअरमन अशोक उपाध्ये होते.
           
         याप्रसंगी उपाध्ये म्हणाले, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी शिक्षणाची गंगा दीनदलित,  गोरगरिबांच्या दरवाजापर्यंत आली. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाली. शिक्षकांमुळेच पिढ्या संस्करीत होतात. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सन्मान व सत्कार करून मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक आर व्ही कुलकर्णी, पर्यवेक्षका विद्या कुलकर्णी, सर्व शिक्षक सेवा वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. राणे शेटे,  प्रास्ताविक शिक्षिका सौ.बाराहाते  तर आभार प्राध्यापक सतीश म्हसे  यांनी मानले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post