संतांच्या भूमीत माजी सैनिक यांना त्रास; मेजर संदिप लगड

राजेंद्र देसाई यांजकडून 
वडाळा महादेव | संताच्या भूमीत माजी सैनिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सैनिकांच्या अडीअडचणी आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी त्रिदल संघटनेची स्थापना केली असून विविध प्रश्न सोडवण्यासाठी संघटना सदैव प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन मेजर संदीप लगड यांनी केले . 

          श्रीरामपूर तालुका माजी सैनिक  संघटना तसेच त्रिदल सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वागत लॉन्स येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर कृष्णा सरदार यांनी केले. तर स्वागत अध्यक्ष बाळासाहेब उंडे यांनी केले. 

        लगड पुढे म्हणाले, माजी सैनिकांच्या विविध समस्या असून जमिनीचे जागेचे वाद, पेन्शन संदर्भात प्रश्न,  घरपट्टी पाणीपट्टी लाईट बिल अशा समस्या निराकरण करण्यासाठी त्रिदल संघटनेची स्थापना केली आहे. या माध्यमातून शहीदपत्नी वीर माता यांना सहकार्य करणे सोपे होणार आहे. यासाठी संघटीत होणे गरजेचे आहे. यावेळी त्रिदल सैनिक संघ प्रदेशाध्यक्ष संदिप लगड, श्रीरामपुर तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब उंडे, सचिव राजेन्द्र शिंदे, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार, कार्याध्यक्ष श्री भाऊसाहेब जाधव, उत्तर नगराध्यक्ष श्री भानुदास पोखरकर, संगमनेर तालुकाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कदम, जिल्हा संघटक श्री अजय देशमुख, जिल्हा सचिव विलास उंडे,  अशोक सहकारी साखर कारखाना सुरक्षा अधिकारी बाळासाहेब राऊत, रोहिदास काळे , रमेश मेहत्रे, श्री लगड खंडागळे, श्रीमती छाया मोटे आदी मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते. मेजर कृष्णा सरदार यांनी स्वतःचे कार्यालय संघटनेसाठी उपलब्ध करून दिले. उपस्थितांचे मेजर सरदार यांनी आभार मानले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post