साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 सप्टेंबर 2020
कै.बन्सीलाल मोतीलाल मुंदडा यांचे स्मरणार्थ नगरपालिका शाळा क्र. ७ श्रीरामपूर या शाळेस टाटा व्होल्टाज कंपनीचे वॉटर फिल्टर मशीन भेट दिले. मुलांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुंदडा परिवाराचे श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी कौतुक केले. वॉटर फिल्टरचे उदघाटन नगराध्यक्षा आदिक यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमासाठी श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार, नगरसेविका सौ .भारती परदेशी, अल्तमश पटेल, देणगीदार सोमनाथ मुंदडा, डॉ संकेत मुंदडा, संदिप मुंदडा, जीवन सोमाणी, प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे साहेब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण निकम, जानराव, आदर्श शिक्षक तथा शाळा क्र. ६ श्रीरामपूरचे मुख्याध्यापक नवनाथ अकोलकर, शाळा क्र.३ च्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका कुर्हे, शाळा क्र.५ चे मुख्याध्यापक सलीमखान पठाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ वंदनाताई मोरगे, अविनाश पोहेकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. शाळेतील प्रज्ञाशोध व मंथन परिक्षेत यशस्वी व गुणवंत विद्यार्थी अथर्व गाडेकर व कु. सायली निकाळजे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा जयकर, सौ.रजनी कर्डीले, श्रीमती मंदाकिनी नगरे, राजेश मुंडलिक यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रजनी कर्डीले यांनी केले. सूत्रसंचलन नवनाथ अकोलकर व आभार ज्ञानेश्वर पटारे साहेब यांनी मानले.