साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 सप्टेंबर 2020
मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शेतांमधील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. पिकांचे तातडीने पंचनामे करून, त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण भागातील शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली.
साईकिरण टाइम्स ©®
या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपाच्या ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी केले. यावेळी अभिजीत कुलकर्णी, सुरेश आसने, देवीदास वाघ, गोकुळ खुरुद, मच्छिंद्र बांगर, विजय नानेकर, नितीन आसने, सतीश शेळके, भाऊराव सुडके, अरविंद नांगळ, काका शेला,रअजय नांन्नोर ,मच्छिंद्र कदम, नामदेव कदम, चेतन वडीतके ,संदीप वाघमारे, दत्ता नगरे ,नवनाथ लाटे, अशोक कारले ,बबनराव मोरे रा,मदास ढोबळे ,गणेश नागळ ,संजय शिंदे, किशोर पगारे, किशोर विटेकर, आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईकिरण टाइम्स ©®
श्रीरामपूर तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी 600 मिलीमीटर आहे. यंदा पर्जन्यवृष्टीने सारे उच्चांक मोडले असून आजपर्यंत ११०० एमएम पावसाची नोंद झाली असल्याचे म्हटले आहे. तालुक्यात गेल्या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व शेतांमधील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या पावसामुळे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी पूर्वीसारखे चर न राहिल्यामुळे या पाण्याचा लवकर निचरा होणार नाही. यामुळे शेतातील सोयाबीन, कापूस ,ऊस ,बाजरी, व फळबागा या पिकांचे पर्जन्यवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागतील. या अस्मानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी या शेतकऱ्यांचे केवळ पंचनामे करून भागणार नाही, तर त्यांना सरसकट, घसघशीत, मोठी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. 'शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे', 'पंचनामे ताबडतोब झालेच पाहिजे', 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' अशा घोषणाही देण्यात आल्या.
साईकिरण टाइम्स ©®