साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधवांचे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करुन तातडीने पंचनामे करण्याची मागणी प्रशासनाकडे केल्याची माहीती, आमदार लहू कानडे यांनी दिली आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी मतदारसंघात वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत तहसीलदार प्रशांत पाटील यांना सर्कल, तलाठी, व कृषी सेवकांन मार्फत झालेल्या पिकं नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आमदार कानडे यांनी म्हटले आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या नुकसानीबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, मदत व पुनवर्सन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्याशी देखील चर्चा झाली असून याविषयात मंत्री मोहदय देखील सकारात्मक असल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, श्रीरामपूर मतदारसंघात वादळी वारा व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे, जेष्ठ नेते जी.के पाटील, इंद्रनाथ थोरात, सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, अरुण पाटील नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे यांनी आमदार लहू कानडे यांच्याकडे केली होती.