शहरातील आशीर्वादनगर भागात दोन जलवाहिनीवर पाण्याचे डबके; नगराध्यक्षांनी लक्ष घालण्याची मागणी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर शहरातील आशीर्वादनगर भागात एका पोट रस्त्यावर पावसाचे अथवा इतर येणारे पाणी वर्षापासून साचून एक डबके तयार झाल्याने तेथे राहणाऱ्या नागरिकांना घरातून रस्त्याकडे चिखलामुळे जाता येत नाही. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी या परिसराला भेट देऊन समस्यांनी पाहणी करावी, अशी मागणी जेष्ठ पत्रकार बी आर चेडे यांनी केली आहे. 

        प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चेडे यांनी म्हंटले आहे की, वर्षानुवर्षे पावसाने येणारे पाणी उतारावरून खाली वाहत जात होते. मध्यंतरी नवीन रस्ता झाल्याने व लहान मुले रस्त्यावर येत असल्याने या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आला. तरीसुद्धा सर्व वाहने वेगानेच जात असतात. कोणाला कोणाची काळजी नसते. या गतीरोधकामुळे उतारावरील पाणी रस्त्यावरून  पोटरस्त्यावर वळले जाते व पाणी साचते. या साचलेल्या पाण्यावरून जड वाहने गेल्याने अजून खड्डा खोल झाल्याने पाणी साचले जाते. या ठिकाणी साचलेल्या पाण्याखाली पिण्याच्या पाण्याच्या दोन जलवाहिनी असल्याने त्यात पाणी पाझरण्याची शक्यता असते काही वेळा पाझरतेसुद्धा व खराब पाणी पिण्याची वेळ आली असल्याने ४ इंची पाइपचे पिण्याचे पाणी न वापरता रस्त्यापासून दुसरीकडून पिण्याची पाईपलाईन जेसीबीने खोदून टाकायची पाळी आली आहे तसेच टेलिफोनची मोठी केबल पाण्याखाली येत असल्याने दूरध्वनी बंद पडण्याची शक्यता आहे. या आधी नगरपालिकेने आधीच्या नगरसेवकांनी एक दोन वेळा मुरूम टाकण्यात आला. परंतु मुरूम टाकूनही काही उपयोग होत नाही. पाण्यामुळे व वाहनामुळे रस्ता परत ६ इंच खाली जातो व डबके तयार होते. ते खोल होत जाते. त्या ठिकाणी गतिरोधक काढून रस्त्याचे बाजूने थोडी खोली अथवा लहान चर जेसीबीने खोदल्यास वारंवार होणारी गैरसोय दूर होईल, असे हा त्रास सहन करीत असलेले जेष्ठ पत्रकार बी आर चेडे यांनी सांगितले.

           या भागात चेडे यांनी वारंवार आधीच्या नगरसेवकांना अडचणी सांगून कॉलनीतील पोटरस्ते करून घेतल्याने गैरसोय दूर झाली,तसेच नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थित होत नव्हता.पाठपुरावा करून ४ इंची पाईपलाईन टाकण्यात आली.तसेच चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने आवश्यक ठिकाणी चेडे यांच्या प्रयत्नाने स्ट्रीट लाईट बसविण्यात आले असताना जो इतरांसाठी धडपडतो त्यालाच अशी परिस्थिती पहावी लागत असल्याने दुर्दैव,या भागात गटारीची अद्याप सोय नाही.संपूर्ण शहरात गटारीची कामे झाली.परंतु या भागात ठेकेदारांनी त्या दरात परवडत नाही असे सांगितल्याने ते काम बंद पडले.नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था करून नवीन निविदा काढून गटारीचे काम करणे आवश्यक होते. त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने हे काम रेंगाळले.त्यामुळे असे प्रकार उद्भवतात, अशा समस्यासाठी व निराकरण करण्यासाठी नगरध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी श्रीरामपूरला जाताना आशीर्वादनगरला भेट देऊन पाहणी करावी. पोटरस्ते हे डांबरीकरण,कॉंक्रीटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी बी आर चेडे यांनी केली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post